Wednesday, April 8, 2020

प्रस्तावना : आमचीये संत निष्काम कर्मयोगी |


आद्यसंत भोजलिंग काका यांच्या चरणी अर्पण...



आमचीये संत निष्काम कर्मयोगी |
उद्याचे होतील बलधारी ||

संत चोखोबांचा हा अभंग आद्यसंत भोजलिंग काका यांच्या व्यक्तित्वाला समर्पक व आजच्या समाजाला प्रेष देण्यासाठी लागू ठरते. आपापल्या चिंतनक्षेत्रातून जेव्हा काळ आणि समाज यांच्यासाठी कोणती कृती आवश्यक ठरेल हे उमगते, तेव्हा कृतीला हेतुपूर्णता लाभते आणि अशी हेतुपूर्ण कृतीच खऱ्या अर्थाने सत्कारणी व सार्थकी ठरते.
आजच्या समाज संवादातूनच उद्याचा समाज घडत असतो, कदाचित हेच परिवर्तन असेल. समाजाचा इतिहास, महामानव व विविध क्षेत्रातील प्रतिभावंत हे समाजासाठी संचित असतात.
"आद्यसंत भोजलिंग काका प्रागतिक विचारमंच " या माध्यमातून समाजासाठी साहित्य,कला,अध्यात्म,संशोधन वृत्तीला मुक्तव्यासपीठ देण्याचा हा प्रयत्न सामाजिक चळ्वळीचाच एक कार्यभाग आहे.
राजसत्ता व धर्मसत्तेच्या मार्तंडांचे आव्हान स्वतःहुन स्वीकारत मानवमुक्तीच्या लढा देणारे महामानव भोजलिंग काका हे समाजासाठी सदैव प्रेरणास्रोत आहेत. यासह समाजातील अनेक बलस्थाने उपेक्षता म्हणण्यापेक्षा दुर्लक्षित आहे. खरंच आज गरज आहे ..आपल्या संवादाची...
आपल्या सामाजिक जाणिवेतूनच समाजासाथीचे प्रागतिक ध्येय गाठण्यासाठी आपले विचार,लेख,साहित्य अवश्य पाठवा.
आपला प्रतिसाद हीच आमची कार्यप्रेरणा !
जय श्री प्रभू विश्वकर्मा..जय क्रांती !

No comments:

Post a Comment