अभिप्राय



वाचकाची प्रतिक्रिया : श्री. संदीपजी दीक्षित
आध्यत्मिक अभ्यासक,प्रवचनकार तथा सामाजिक क्षेत्रात अग्रेसर
संपर्क : ९८२२२१७६५५,९५११२५२१६१

अखिल मानव जातीच्या कल्याणाचा मार्ग, सुख शांती समाधानाचा मोक्षाचा मार्ग. अध्यात्माच्या क्षेत्रामध्ये अनेक ऋषीमुनी साधू संत महापुरुषांनी अखंड भारत वर्षाला दिलेला आहे ,अखंड मानवजातीला दिलेल्या हाच विचार बाराव्या शतकामध्ये महाराष्ट्राच्या अध्यात्मिक विषयाचे बीज ज्या संतांनी महाराष्ट्राच्या मातीमध्ये बीजांकुरीत केलं त्यामध्ये अग्रगण्य नाव आणि अग्रगण्य योगदान हे संत श्रेष्ठ भोजलींग काकांचा आहे हे नाकारता येणार नाही .

महाराष्ट्राच्या अध्यात्माचा पाया हा संत श्रेष्ठ भोजलींग काकांनी रचलेला आहे त्यांनी दिलेले योगदान जातीपातीच्या द्वेष वासराच्या विषारी विचार प्रणालीच्या माध्यमातून दुर्लक्षित ठेवण्यात आले आहे हे नाकारता येणार नाही , संत निवृत्तीनाथ, संत ज्ञानेश्वर, संत सोपानदेव ,संत मुक्ताबाई , आज एकविसाव्या शतकात जात असताना या संत भावंडांचा संभाळ करण्याचे कारण यांना वाढवण्याचे कार्य यांना ज्ञानार्जन करण्याचे कार्य हे परमपूज्य संत श्रेष्ठ भोजलींग काका यांनी केलेले आहे ,आणि हा जाज्वल्य भूतकाळ आहे जरी तो विसरला गेला असला तरी, तो सत्य आहे व सत्यच राहणार, ज्ञानेश्वर महाराजांनी अध्यात्माचा पाया रोवला अध्यात्माला एक वेगळं वलय प्राप्त करून दिलं एक वेगळे महत्त्व प्राप्त करून दिलं आणि हे देताना वयाच्या एकविसाव्या वर्षी ज्यावेळेला समाधिस्थ झालेकोरेगाव जिल्हा सातारा

त्यावेळेला सदरची समाधी आळंदीला येऊन संत भोजलींग काका यांच्या समाधीच्या ठिकाणी म्हणजेच संत श्रेष्ठ भोजलींग काका यांच्या चरणाशी घेतली, एवढा मोठा अधिकार संत ज्ञानेश्वर महाराजांनी संत भोजलींग काकांना दिलेला आहे, हे आजच्या अध्यात्मिक अभ्यासकांनी अध्यात्मिक वक्त्यांनी, कीर्तन ,प्रवचन करांनी मनापासून याचा स्वीकार करायला हवा की जर संत ज्ञानेश्वर माऊली संत भोजलींग काकांना एवढा मोठा अधिकार देतात ,तर बाकीच्या महाराष्ट्रातील आणि महाराष्ट्राच्या बाहेरील अध्यात्मिक क्षेत्रांमधील धुरिणांनी संत भोजलींग काकांचा संत म्हणून स्वीकार करणे हेच आद्यकर्तव्य आहे ,आणि ते प्रत्येकाने करायला हवं ,असो यथावकाश अजून बोलू . 

जय विश्वकर्मा 
जय कालिका माता 
जय संत श्रेष्ठ भोजलींग काका महाराज

संदीप दीक्षित महाराज कोरेगाव जिल्हा सातारा 

2 comments:

  1. Dear Dixit Sir 💐 I am MaheshKumar Sutar 86000060042 from Panchal Sutar family and our relatives are Dixit from Masur and Panchal from aundy Namaskar aple samajkarya la 💐🙏

    ReplyDelete
  2. दीपक भालेरावMay 23, 2022 at 4:00 AM

    "ज्ञानदेवे रचिला पाया तुका झालासे कळस"या संत उक्तीद्वारे व उपलब्ध संतसाहित्य व चरित्रांतून महाराष्ट्रातील संतांचा परिचय सर्वांना होतो मात्र ज्ञानदेवांनी वारकरी संप्रदायाचा पाया घातला हे जितके सत्य आहे तितकेच त्यांना व त्यांच्या भावंडाना जेव्हा समाजाने वाळीत टाकले,त्यांच्या आईवडिलांनी देहान्त प्रायश्चित घेतले तेव्हा या अनाथ भावंडांचे पालनपोषण सुतार समाजाचे संत भोजलींग काका यांनी केले.त्यामुळे त्यांचे कार्य किती मोठे आहे हे समजते.पण त्यांना इतिहास तर विसरलोच आहे पण सुतार समाजही विसरला आहे.अशा परिस्थितीत आपण त्यांना समाजासमोर आणले आहे त्याबद्दल आपले अभिनंदन!

    ReplyDelete